Gmail प्रोग्राम धोरणे

Gmail प्रोग्राम धोरणे Gmail वापरणाऱ्या प्रत्येकाला एक सकारात्मक अनुभव देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. ही धोरणे बदलू शकतात त्यामुळे, वेळोवेळी पुन्हा तपासून खात्री करा. अधिक माहितीसाठी कृपया Google च्या सेवा अटी पाहा.

स्पॅम आणि मोठ्या प्रमाणात मेल

स्पॅम किंवा अनपेक्षित व्यावसायिक ई-मेल वितरीत करण्यासाठी Gmail वापरू नका.

आपल्याला CAN-SPAM एक्ट किंवा एंटी—स्पॅम कायद्यांचे उल्लंघन करणारे ईमेल पाठविण्यास; खुल्या, तृतीय पक्ष सर्व्हरद्वारे अनाधिकृत ईमेल पाठविण्यास; किंवा कोणत्याही व्यक्तीचे ईमेल पत्ते त्यांच्या संमतीशिवाय वितरीत करण्यास Gmail चा वापर करण्याची अनुमती नाही.

वापरकर्त्यांची दिशाभूल किंवा फसवणूक करण्यासाठी ईमेल पाठविणे, हटविणे किंवा फिल्टर करण्यासाठी आपल्याला Gmail इंटरफेस स्वयंचलित करण्याची अनुमती नाही.

कृपया लक्षात ठेवा आपल्या ईमेल प्राप्तकर्त्यांसाठी ''अनपेक्षित'' किंवा ''अवांछित'' मेलची परिभाषा भिन्न असू शकते. मोठ्या संख्येत प्राप्तकर्त्यांना ईमेल पाठविताना निर्णयाचा सराव ठेवा, प्राप्तकर्त्यांनी भूतकाळात आपल्याकडून ईमेल प्राप्त होणे निवडले असले तरीही. जेव्हा Gmail वापरकर्ते ईमेलना स्पॅम म्हणून चिन्हांकित करतात, तेव्हा आमच्या गैरवापर रोधक सिस्टीमद्वारे आपण पाठविलेले भविष्यातील संदेश त्यानुसार वर्गीकृत केले जाण्याची शक्यता वाढविते.

एकाधिक Gmail खात्यांची निर्मिती आणि वापर

Google धोरणांचा गैरवापर करण्यासाठी, Gmail खाते मर्यादा ओलांडण्यासाठी, फिल्टर टाळण्यासाठी किंवा अन्यथा आपल्या खात्यावरील प्रतिबंध नष्ट करण्यासाठी एकाधिक खाती तयार करू नका किंवा वापरू नका. (उदाहरणार्थ, आपल्याला दुसऱ्या वापरकर्त्याद्वारे अवरोधित केले गेले असल्यास किंवा आपले Gmail खाते गैरवापरामुळे अक्षम करण्यात आल्यास, समान क्रियाकलाप करणारे दुसरे खाते तयार करू नका.)

आपल्याला स्वयंचलित साधनांद्वारे Gmail खाते तयार करण्यासाठी किंवा Gmail खात्यांची खरेदी, विक्री, व्यापार किंवा इतरांना पुन्हा विक्री करण्याची देखील अनुमती नाही.

मालवेअर

व्हायरस, वॉर्म्स, दोष, ट्रोजन हॉर्सेस, दुषित फायली किंवा विध्वंसक किंवा फसव्या प्रकारचे इतर कोणतेही आयटम प्रसारित करण्यासाठी Gmail चा वापर करू नका. याव्यतिरिक्त, Google किंवा इतरांच्या नेटवर्क, सर्व्हर किंवा इतर मूलभूत संरचनांचे संचालन करण्यास हानी पोहोचवणारी किंवा त्यात हस्तक्षेप करणारी सामग्री वितरित करू नका.

फसवणूक, फिशिंग, आणि इतर फसवे व्यवहार

आपण अन्य वापरकर्त्याच्या खात्यात त्यांच्या परवानगीशिवाय प्रवेश करू शकत नाही. खोट्या बतावण्यांतर्गत सामायिक माहितीमध्ये इतर वापरकर्त्यांना ट्रिक, भ्रमित किंवा फसविण्यासाठी Gmail चा वापर करू नका.

लॉगिन माहिती, संकेतशब्द, वित्तीय तपशील किंवा शासकीय ओळख नंबर यासारख्या वापरकर्त्याच्या डेटासाठी फिशिंग करू नका किंवा इतरांची फसवणूक करण्यासाठी योजनेचा एक भाग म्हणून Gmail चा वापर करू नका.

मुलांची सुरक्षितता

Google चे लहान मुलांच्या लैंगिक गैरवर्तनाविरूद्ध शून्य-सहिष्णुता धोरण आहे. आम्हाला अशा सामग्रीची जाणीव झाल्यास, आम्ही कायद्यानुसार नॅशनल सेंटर फॉर मिसिंग एंड एक्सप्लॉइटेड चिल्ड्रनला अहवाल देऊ. आम्ही Gmail खात्याविरुद्ध समाप्तीच्या कारवाईसह शिस्तभंगाची कारवाई देखील करू शकतो.

Google prohibits the grooming of children using Gmail, defined as a set of actions aimed at establishing a connection with a child to lower the child's inhibitions in preparation for sexual abuse, trafficking, or other exploitation.

If you believe a child is in danger of or has been subject to abuse, exploitation, or been trafficked, contact your local law enforcement immediately.

If you have already made a report to law enforcement and still need help, or you have concerns a child is being or was subjected to grooming using Gmail, you can report the behavior to Google using this form. Please remember that you can always block any person you do not want to be contacted by on Gmail.

कॉपीराइट

कॉपीराइट कायद्यांचा आदर करा. पेटंट, ट्रेडमार्क, व्यापार गुपीत, किंवा इतर मालकी हक्क सह, इतरांच्या बौद्धिक संपत्ती अधिकारांचे उल्लंघन करण्यास प्रेरित करू नका. इतरांना बौद्धिक संपत्ती अधिकारांचे उल्लंघन करण्यासाठी प्रोत्साहित किंवा प्रेरित करण्याची देखील अापल्याला अनुमती नाही. हा फॉर्म वापरून आपण Google कडे कॉपीराइट उल्लंघनाचा अहवाल देऊ शकता.

उत्पीडन

इतरांना त्रास देण्यासाठी, भीती दाखविण्यासाठी किंवा धमकावण्यासाठी Gmail वापरू नका. कोणीही या हेतूंसाठी Gmail चा वापर करत असल्याचे आढळल्यास त्यांचे खाते अक्षम केले जाऊ शकते.

बेकायदेशीर क्रियाकलाप

कायदेशीर काम करा. बेकायदेशीर क्रियाकलापांचा प्रचार करण्यात, ते व्यवस्थापित किंवा त्यात गुंतण्यासाठी Gmail वापरू नका.

धोरण अंमलबजावणी

हा फॉर्म वापरून आपण गैरवर्तनाचा अहवाल देऊ शकता. Google या धोरणांचे उल्लंघन करणारी खाती आढळल्यास ती अक्षम करू शकते. आपले खाते अक्षम झाले असल्यास आणि ही एक चूक होती असा आपल्याला विश्वास असल्यास, कृपया या पृष्ठावरील सूचनांचे अनुसरण करा.